महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM)

सरकार ही योजना कडधान्ये, धान, गहू, तेलबिया आणि तेल पाम, भरडधान्य आणि पौष्टिक अन्नधान्यांसाठी चालवते."

NFSM डाळी

मूग, उडीद, तूर, हरभरा, लाखखोली या पिकांच्या 10 वर्षांखालील प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना अनुदानित दरात पुरवले जाते.

NFSM भात

ही योजना राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये (नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, पुणे आणि सातारा) लागू आहे.

उत्कृष्ठ उत्पादने



“गुणवत्तापूर्ण बियाणे, रास्त दर: प्रत्येक शेतक-यांस सक्षम करण्याच्या उद्देशाने 1976 पासुन कार्यरत”

प्रत्येक स्तरातील शेतक-यास उच्च गुणवत्तेचे बियाणे, रास्त दरात मिळावे यावर महाबीजचा ठाम विश्वास आहे. आमच्या बियाणे गुणवत्तेच्या वचनबध्दतेवर, स्वतंत्र अशा राज्य बिज प्रमाणिकरण यंत्रणेच्या कठोर चाचण्यांव्दारे शिक्कामोर्तब केले जाते. 1976 पासुन, महाबीजने तळागळातील शेतक-यांना बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे उदयोगात दरांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य चोखपणे बजावत आले आहे.

आम्ही कृषि संशोधनास प्रोत्साहन देण्यास समर्पित आहोत, आणि शेतक-यांना सुधारीत गुणधर्म असलेले नविनतम वाण उपलब्ध करून देण्याचा अविरत प्रयत्न करीत आहोत. याव्यतिरीक्त, महाबीज जैवतंत्रज्ञान (टिश्यु कल्चर) व पर्यावरणपुरक जैविक खते व बुरशीनाशके या क्षेत्रात सुध्दा महाबीजने एक उदयोन्मुख संस्था म्हणुन कार्यास आरंभ केला आहे. हेच आमच्या नवकल्पनांसाठी असलेल्या वचनबध्दतेचे द्योतक आहे.

महाबीज सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना, बियाणे क्षेत्रात, दृढ विश्वास, उच्चतम गुणवत्ता, दर नियंत्रण आणि नवकल्पना अधिक बळकट करण्याकरीता आम्ही सकारात्मक दृष्टीने प्रयत्न करत आहोत. आपण या प्रवासात महाबीजचे विश्वासू साथीदार असल्याबद्दल आपले शतश: धन्यवाद.

 

 

महामंडळामार्फत राज्यातील बिजोत्पादक, शेतकरी बांधव, महाबीज विक्रेते तसेच कृषि क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना कृषि संवादाचं व्यासपीठ म्हणून ख्याती असलेलं “महाबीज वार्ता” त्रैमासिक अंक छापील स्वरुपात वार्षिक वर्गणी रु. 50/- दराने उपलब्ध्‍ा करुन देण्यात येत होता.

 

Admin Thumb
श्री विकास चंद्र रस्तोगी, भा.प्र.से.,
अध्यक्ष (महाबीज) तथा परधान सचिव (कृषी),कृषी विभाग, मंत्रालय, मुंबई

Admin Thumb
श्री योगेश कुंभेजकर, भा.प्र.से.,
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित

About Image