महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

विपणन

विभाग / उप-विभाग

गुणवत्ता नियंत्रण व संशोधन

विपणन

परिचय

“गुणवत्तापूर्ण बियाणे, रास्त दर: प्रत्येक शेतक-यांस सक्षम करण्याच्या उद्देशाने 1976 पासुन कार्यरत”

प्रत्येक स्तरातील शेतक-यास उच्च गुणवत्तेचे बियाणे, रास्त दरात मिळावे यावर महाबीजचा ठाम विश्वास आहे. आमच्या बियाणे गुणवत्तेच्या वचनबध्दतेवर, स्वतंत्र अशा राज्य बिज प्रमाणिकरण यंत्रणेच्या कठोर चाचण्यांव्दारे शिक्कामोर्तब केले जाते. 1976 पासुन, महाबीजने तळागळातील शेतक-यांना बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे उदयोगात दरांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य चोखपणे बजावत आले आहे.

आम्ही कृषि संशोधनास प्रोत्साहन देण्यास समर्पित आहोत, आणि शेतक-यांना सुधारीत गुणधर्म असलेले नविनतम वाण उपलब्ध करून देण्याचा अविरत प्रयत्न करीत आहोत. याव्यतिरीक्त, महाबीज जैवतंत्रज्ञान (टिश्यु कल्चर) व पर्यावरणपुरक जैविक खते व बुरशीनाशके या क्षेत्रात सुध्दा महाबीजने एक उदयोन्मुख संस्था म्हणुन कार्यास आरंभ केला आहे. हेच आमच्या नवकल्पनांसाठी असलेल्या वचनबध्दतेचे द्योतक आहे.

महाबीज सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना, बियाणे क्षेत्रात, दृढ विश्वास, उच्चतम गुणवत्ता, दर नियंत्रण आणि नवकल्पना अधिक बळकट करण्याकरीता आम्ही सकारात्मक दृष्टीने प्रयत्न करत आहोत. आपण या प्रवासात महाबीजचे विश्वासू साथीदार असल्याबद्दल आपले शतश: धन्यवाद.