महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

गहू

गहू

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
एन आय ए डब्लू-३६२४ (फुले अनुपम) म. फु. कृ. वि., राहुरी २०२२ १०० १०५ ते ११० प्रथिनाचे प्रमाण ११.४० टक्के, चकाकणारा दान, चापातीसाठी उपयुक्त. बागायती क्षेत्रावर वेळेवर लागवडीस  उपयुक्त ३० ते ३५
एच आय-१६३३ (पुसा वाणी) आय ए आर. इंदोर २०२१ १०० ८१ ते ११४ मध्यम आकाराचा दाणा, निमपसरी वाढ ४१
जी डब्लू -१३४६ ए आर. एस, गुजरात २०२० १०० ८९ ते ११९ भरपूर उत्पन्न देणारे वाण, मध्यम आकाराचा दाणा.  ४०
डिबीडब्ल्यु-168 आय आय डब्ल्यु बि आर. कर्नाल, हरियाणा २०१८ १०० 100 ते 105 मोमदार गडद हिरवी पाने, निम्म सरळ उभी वाढ, मध्यम मोमदार समांतर आकाराची ओंबी. 48.2
पीडीकेव्ही सरदार डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला २०१६ १०० ९० ते १०० निम्न सरळ वाढ, लांब ओंबी, अंडाकृती मध्यम आकाराचे व अंबर रंगाचे टणक दाणे, कमी कालावधीत परिपक्व होणारे वाण, अधिक उत्पादन, महत्त्वाच्या रोगांना प्रतिकारक, १२.२५ टक्के प्रथिने प्रमाण, लोह व झिंकचे प्रमाण जास्त. ४० ते ४२
फुले समाधान म. फु. कृ. वि., राहुरी २०१४ १०० ९५ ते १०२ मेणासारखी मध्यम आकाराची पाने, सरळ उभी वाढ, समांतर पांढ-या रंगाच्या ओंब्या, मध्यम आकाराचे अंडाकृती टणक तपकिरी दाणे, तांबेरा रोगास प्रतिकारक. ४४ ते ४८
एमएसीएस-६४७८ आघारकर अनुसंधान केंद्र, पुणे २०१४ १०० १०० ते ११० मध्यम उंची मोमदार खोड, मोमदार गडद हिरवी पाने, निम्म सरळ उभी वाढ, मध्यम मोमदार समांतर आकाराची ओंबी, चकाकणारे दाणे. ४५ ते ४८
एकेडब्ल्यु-४६२७ डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला २०१२ १०० ९५ ते १०० टणक खोड, मोमदार नसलेली रुंद पाने, सरळ वाढ, २ ते ३ फुटवे, लोळण्यास मध्यम सहनशील, न झडणारी ओंबी, अंडाकार अंबर रंगाचे मध्यम कठिण दाणे, तांबेरा व करपा रोगास प्रतिकारक. ३८ ते ४०
युएएस-४२८ कृषी विज्ञान केंद्र, धारवाड २०१२ १०० 108 न लोळणारी, फिक्कट हिरवी मध्यम लांबट पाने, निम्न उभट वाढ, कुसळ असलेली मध्यम आकाराची पांढरट न झडणारी ओंबी, लंब वर्तुळाकार मध्यम अंबर रंगाचे दाणे. ४४ ते ४७
नेत्रावती म. फु. कृ. वि., राहुरी २०११ १०० १०५ ते ११५ टणक खोड, सरळ उभी वाढ, न लोळणारी, कुसळ असलेली ओंबी, दाणे झडण्यास सहनशील, अंडाकार मध्यम आकाराचे अंबर रंगाचे दाणे. १५ ते २०
एमएसीएस-६२२२ आघारकर अनुसंधान केंद्र, पुणे २०१० १०० १०२ ते १०६ गडद हिरवी जाड पसरट पाने, निम्म सरळ उभी वाढ, मध्यम बुटकी जात, समांतर पांढरट ओंबी, अंडाकार अंबर रंगाचे मध्यम टणक दाणे, तांबेरा रोगास प्रतिकारक. ४७ ते ५०
एच आय -१५४४ (पुर्णा) गहु संशोधन केंद्र, इंदौर २००८ १०० ११५ ते १२० न लोळणारी खाली वाकलेली हिरवी पाने, निम्न उभी वाढ, लंब वर्तुळाकार पांढरट मध्यम आकाराची न झडणारी लोंबी, गोलाकार अंबर रंगाचे चकाकणारे मध्यम टणक दाणे, अवर्षणास जास्त प्रतिकारक. ४८ ते ५२
एच. आय.-८६६३ (पोषण) गहु संशोधन केंद्र, इंदौर २००८ १०० ११५ ते १२० न लोळणारी, निम्न उभी वाढ, लंब वर्तुळाकार पांढरट मध्यम आकाराची न झडणारी ओंबी, गोलाकार अंबर रंगाचे चकाकणारे मध्यम टणक दाणे, अवर्षणास जास्त प्रतिकारक. ४५ ते ५०
जीडब्ल्यु-४९६ एस.डी.ए.यु., विजापूर, गुजरात १९९० १०० ९६ ते ११३ पिवळसर टणक दाणा, भरपूर उत्पादन क्षमता. ४५ ते ४८
लोक-१ लोकभारती सनसोरा, गुजरात १९८१ १०० १०० ते १०५ लालसर टपोरे दाणे, भरघोस उत्पादन क्षमता असलेला लोकप्रिय वाण. ३७ ते ४०
-->