"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला यांचेद्वारे प्रकाशित होणारे महाबीज वार्ता हे त्रैमासिक शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि कृषी क्षेत्रातील निगडीत सर्वांसाठी माहितीचे स्त्रोत बनले आहे! या त्रैमासिकाचे प्रकाशित करण्यात आलेले अंक वाचकांच्या पसंतीस उतरले असून हे मासिक सातत्याने लोकप्रिय होत आहे.
महाबीज वार्ताचे यशाचे रहस्य
कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाकडे शेतकरी बांधवांचा वाढणारा कल लक्षात घेऊन महाबीज वार्ता अंकाद्वारे कृषी तज्ज्ञांचे माहितीपूर्ण सखोल लेख व प्रात्यक्षिकातून प्राप्त महत्वपूर्ण निष्कर्ष याबाबत शेतकरीबांधवाना शास्त्रीय व महत्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येते.
या मासिकातील आखीव व रेखीव मांडणी, आकर्षक छायाचित्रे आणि समजण्यास अत्यंत सोपी भाषा यामुळे हे मासिक शेतकऱ्यांसह सामान्य वाचकांसाठी वाचनीय ठरले आहे.
या व्यासपीठाद्वारे प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ आणि संशोधकांचे ज्ञान आणि कौशल्य वाचकांना उपलब्ध झाल्याने त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होऊन त्यांचा कृषीविषयक दृष्टीकोन सुधारण्यास मदत होते.
महाबीज वार्ताच्या प्रत्येक अंकाद्वारे शेतकरीबांधवांच्या गरजा, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना याबाबतची माहिती प्राधान्याने देण्यात येते.
वाचकांचे मनोगत
“कृषी क्षेत्रातील अद्ययावत माहिती, तज्ज्ञांचे सल्ले आणि आवश्य्ाक मार्गदर्शन मला महाबीज वार्ता या त्रैमासिकातून प्राप्त्ा होत आहे आणि याव्दारे मला माझे शेतीतील खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याकरिता निश्चितच मदत झाली आहे.”
-श्री. प्रकाश काकड, महाबीज बिजोत्पादक, सांगळूद, जि. अकोला
"मला महाबीज वार्ता या मासिकाद्वारे अद्ययावत, नाविन्यपूर्ण व शाश्वत कृषीविषयक तंत्रज्ञान याबाबत सखोल माहिती प्राप्त होत आहे. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की, त्यांनी शेतीबद्दल अद्ययावत माहितीकरिता हे मासिक वाचलेच पाहिजे."
- श्री. संदिप भांडे, प्रगतशील शेतकरी, वडनेर गंगई, जि. अमरावती
महाबीज वार्ताची अंकाची डिजिटल प्रत आत्ताच मिळवा!
महाबीजच्या ४७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक २८ एप्रिल, २०२३ रोजी राज्याचे तत्कालीन कृषि मंत्री मा. अब्दुलजी सत्तार यांचे शुभहस्ते आणि महाबीजचे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. सचिन कलंत्रे तसेच मा. संचालक श्री. वल्लभरावजी देशमुख, मा. संचालक डॉ. रणजित सपकाळ, बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक श्री. संतोष आळसे यांचे प्रमुख उपस्थितीत महाबीज वार्ता डिजीटल अंकाचे लोकार्पण करण्यात आले.
महाबीज वार्ता त्रैमासिकाचे अंक आता डिजिटल स्वरूपात महाबीजच्या वेबपेज आणि संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यासोबतच महाबीज वार्ताचे अंक कृषी आणि संबंधित क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्वांसाठी तात्काळ उपलब्ध होण्यासाठी खाली दिलेला क्युआर कोड स्कॅन करावा. आजच महाबीज वार्ताची डिजिटल आवृत्ती प्राप्त करुन कृषी क्षेत्रातील शास्त्रीय आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळवून संपन्न व्हा !
महाबीज वार्ता वेब ॲप्लीकेशन : http://news.mahabeej.org
महाबीज संकेतस्थळ : www.mahabeej.com
महाबीज वार्ता संदर्भातील वाचकांच्या सुचना व अभिप्राय varta@mahabeej.com या ई-मेलवर स्वागतार्ह आहेत.