महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

सोयाबीन

सोयाबीन

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
एमएयुएस-725 व.ना.म.कृ.वि., परभणी 2023 75 90 ते 95 निश्चित वाढ, चिरकी मोठी व गडद हिरवी पाने, 20 ते 25 टक्के शोंगामध्ये चार दाण्याचे प्रमाण, मराठवाडा व विदर्भात  लागवडीस शिफारस. 25 ते 31.50
केडीएस-992 (फुले दुर्वा) म.फु.कृ.वि., राहुरी 2021 75 95 ते 100  पानाचा आकार थोडा त्रिकोणी, फिक्कट हिरवी व तीन पानाची संख्या जास्त, एका ठिकाणी पाच ते सहा शेंगा व खोडावर व शेंगावर केस असतात.  27 ते 35
एएमएस-100-39 (पिडीकेव्ही अंबा) डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला 2021 75 94 ते 96 फुलाचा रंग जांभळा, लवकर परिपक्व होणारे वाण, परिपक्वतेनंतर दहा ते बारा दिवसापर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक. 28 ते 30
एमएसीएस-1460 आघारकर अनुसंधान केंद्र, पुणे 2021 75 89 ते 91 फुलांचा रंग पांढरा, शेंगा फुटण्यास प्रतिकारक, विविध किडी रोगांना मध्यम प्रतिकारक, मध्य व पश्चिम महाराष्ट्रास लागवडीसाठी योग्य.  22 ते 38
एएमएस-एमबी-५-१८ (सुवर्ण सोया) डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला 2021 75 ९८ ते १२० कापणीच्या परिपक्वतेपासून १० दिवसांपर्यंत शेंग फुटण्यास प्रतिरोधक. २३ ते २५
केडीएस-७५३ (फुले किमया) म.फु.कृ.वि., राहुरी 2020 75 100 ते 105 फुलांचा रंग जांभळा, पानाचा आकार गडद हिरवा, चार पानाची  संख्या जास्त, पाने थोडी जाड व गोलाकार, मध्यम आकाराचा दाणा.  27 ते 32
फुले संगम म.फु.कृ.वि.,राहुरी 2019 75 110 ते 115 जांभळया रंगाची फुले, पानांचा रंग पातळ व  फिक्कट हिरवा, चार व पाच पानाचे प्रमाण जास्त, दान्याचा रंग आकर्षक व पिवळसर. २5 ते 30
जेएस-२०-११६ ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर 2019 75 ९७ ते १०१ फुलांचा रंग पांढरा, गोलाकार पाने. २० ते २२
जेएस-२०-११६ ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर 2019 75 ९७ ते १०१ फुलांचा रंग पांढरा, गोलाकार पाने. २० ते २२
एमएयुएस-६१२ व.ना.म.कृ.वि. परभणी 2016 75 ९३ ते ९८ जास्त सरळ उंच वाढणारे वाण, शेंगा तडकण्यास सहनशील, २ ते ३ दाणे प्रति शेंग, पिवळसर दाणा, कमी ओलाव्यास सहनशील, विविध किडी व रोगांना प्रतिकारक. 31 ते 35
जेएस-२०-९८ ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर 2017 75 ९६ ते ९८ पांढरी फुले, शेंगा तडकण्यास सहनशील, पिवळसर दाणा, किडरोगांना प्रतिकारक. २५ ते २८
एमएयुएस-१६२ व.ना.म.कृ.वि., परभणी 2012 75 १०० ते १०३ सरळ उंच वाढणारे वाण, फिक्कट जांभळ्या रंगाची फुले, झाडाच्या शेंडयापर्यंत शेंगा लागतात, शारीरिक परिपक्तवेनंतर 12 ते 15 दिवसापर्यंत शेंगा तडकण्यास सहनशील, २ ते ३ दाणे प्रति शेंग, पिवळा दाणा, मशीनद्वारे कापणीस योग्य, रोग व किडींना प्रतिकारक. २० ते ३०
एमएयुएस-१५८ व.ना.म.कृ.वि. परभणी 2010 75 ९३ ते ९८ चोपडी गडद हिरवी पाने, जांभळया रंगाची फुले, बदामी रंगाच्या शेंगा, शेंगा तडकण्यास सहनशील, पिवळसर आयाताकृती मध्यम आकाराचे दाणे, मुळखुज, खोडकुज व खोडमाशी किडीस प्रतिकारक्षम. २२ ते २५
जेएस-९५-६० ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर 2007 75 ८२ ते ८८ लवकर परिपक्व होणारा वाण, मध्यम गडद हिरव्या रंगाची पाने, जांभळया रंगाची फुले, गडद तपकिरी शेंगा, करडा व पिवळसर गोलाकार जाड दाणा, रोग किडींना प्रतिकारक्षम.  १८ ते २०
डीएस-२२८ म.फु.कृ.वि., राहुरी 2003 75 ९५ ते १०० मध्यम आकाराचे दाणे, १०० दाण्याचे वजन १४ ग्रॅम, तेलाचे प्रमाण १७ ते २५ टक्के. २३ ते २५
एमएयुएस -७१ व.ना.म.कृ.वि. परभणी 2002 75 ९३ ते १०० खोडावर करडया रंगाची लव, चोपडी हिरवी पाने, जांभळया रंगाची फुले, आयाताकृती पिवळसर दाणे, कमी ओलाव्यास सहनशील, न फुटणारे वाण, रोग व किडींना प्रतिकारक.  २० ते ३०
जेएस-९३-०५ ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर 2002 75 ९० ते ९५ हिरवी पाने, सरळ वाढणारे व न पडणारे वाण, जांभळया रंगाची फुले, शेंगा तडकण्यास सहनशील, ४ दाणे प्रति शेंग, पिवळसर दाणे. २० ते २५
जेएस-३३५ ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर 1994 75 ९० ते ९५ झाडाची उंची ४६ सें.मी., खोडावर किंचीत लव, किंचीत लव असलेली हिरवी पाने,‍ जांभळी फुले, चोपड्या शेंगा, शेंगा तडकण्यास सहनशील, पिवळसर गोलाकार दाणे, सर्वात लोकप्रिय वाण व आंतरपिकास योग्य. २५ ते ३०
-->