महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

रब्बी ज्वारी

रब्बी ज्वारी

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
आर एस व्ही.-१९१० (फुले यशोमती) म. फु. कृ. वि., राहुरी २०२३ १० ११२ ते ११५ मोत्यासारखा मध्यम गोलाकार दाणा, खोद्मशीस व खोड किडीस मध्य सहनशील, काडी बुरशी रोगास मध्यम प्रतिकारक  ९ ते ११
पी. व्ही. के. -१००९ (परभणी शक्ती)) व. ना. म. कृ. विद्यापीठ, परभणी २०२२ १० ११५ ते १२० धान्य व चारा पिकास लागवडीस उपयुक, उत्तम प्रतीचे चपाती, लोहाचे प्रमाण व जस्ताचे प्रमाण जास्त. दाण्यावरील काळी बुरशी, खोड मशीस व खोड किडीस मध्यम सहनशील. ३६ ते ३८
एस पी व्ही-२४०७ (परभणी सुपरमोती) म. फु. कृ. वि., राहुरी २०२१ १० ११८ ते १२० उत्तम प्रतीचा दाणा, खोड किडीस, काळी बुरशी व खोड माशीस प्रतिकारक्षम. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागास लागवडीस उपयुक्त. ३१ ते ३३
फुले सुचित्रा म. फु. कृ. वि., राहुरी २०१३ १० १२० ते १२५ मध्यम जाड दाणे (१००० दाण्याचे वजन ३० ते ३२ ग्रॅम), कडबा व धान्याची प्रत चांगली, रासायनिक खते व पाण्याचे उत्तम प्रतिसाद. २० ते २५
परभणी ज्योती व. ना. म. कृ. विद्यापीठ, परभणी २००९ १० १२५ ते १३०  बागायतीसाठी उत्त्तम वाण, उंच वाढणारा, लोळण्यास प्रतिकारक्षम, माव्यास प्रतिकारक्षम, बागायती लागवडीस योग्य. ३८ ते ४०
फुले रेवती म. फु. कृ. वि., राहुरी २००९ १० ११८ ते १२० बागायती वाण, खोडकिडीस सहनशील,झाडाची उंची २२० ते २४० सें. मी. ४० ते ४५
फुले अनुराधा म. फु. कृ. वि., राहुरी २००८ १० १०५ ते ११० कोरडवाहु वाण, प. महाराष्ट्र करीता विकसित, खोडकिडा, खोडमाशी करीता सहनशील. १० ते १२
फुले वसुधा म. फु. कृ. वि., राहुरी २००७ १० ११६ ते १२० झाडाची उंची १८० ते २१० सें.मी., ५० टक्के फुलो-यात येण्याचा कालावधी ७४ ते ७८ दिवस, दाण्याचा आकार गोल व रंग मोत्यासारखा पांढरा. २५ ते २८
परभणी मोती व. ना. म. कृ. विद्यापीठ, परभणी २००२ १० १२६ ते १२९ प. महाराष्ट्रातील हलक्या जमिनी व्यतिरिक्त मध्यम ते भारी जमिनीत कोरडवाहु व बागायती लागवडीसाठी योग्य, रासायनिक खते व पाण्यास उत्तम प्रतिसाद, दाणे व वैरणीची प्रत चांगली, मोत्यासारखे चमकदार आणि टपोरे दाणे. ३२ ते ३५ 
एम-३५-१ (मालदांडी)  डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला १९८४ १० १२५ ते १३५ उंच वाढणारा व पाण्याचा ताण सहन करणारा वाण, मोत्यासारखा टपोरा दाणा.  २० ते २५

 

 

-->