महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत

महिला तक्रार निवारण कक्ष

महिला तक्रार निवारण कक्ष

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास शासन निर्णय क्र.मकचौ-२०१३/प्र.क्र.६३/मकक नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई-३२, दि.१९ जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार “कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा, २०१३” (POSH Act, 2013) अन्वये प्राप्त तक्रारींची चौकशी करण्यासाठी प्रशासन विभागाचे कार्यालयीन आदेश क्र.2026/644 दि.27.05.2026 अन्वये महाबीज मुख्य कार्यालय, अकोला स्तरावर स्थापन केलेली “अंतर्गत तक्रार समिती” व विभागीय कार्यालय स्तरावर “स्थानिक तक्रार समिती” या कायदेशीर समित्या आहेत.

कायदे, नियम व शासन निर्णय, संदर्भ इ. माहिती:

अ. क्र. कायदे, नियम व शासन निर्णय PDF फाइल
1 केंद्र शासनाचा कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 तसेच त्याबाबतचे नियम दि.09.12.2013. फाइल उघडण्यासाठी क्लिक करा
2 शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्र. मकचौ-2013/प्र.क्र.63/मकक, दि.19.06.2014. फाइल उघडण्यासाठी क्लिक करा
3 शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्र. मकचौ-2014/प्र.क्र.63/मकक, दि.11.09.2014. फाइल उघडण्यासाठी क्लिक करा
4 शासन परिपत्रक क्रमांक: रिटपी 2018/प्र.क्र.8/का-15, दि.24.11.2023 फाइल उघडण्यासाठी क्लिक करा
5 शासन परिपत्रक क्रमांक मकक 2026/प्र.क्र.11/का.15, दि.14.05.2026. फाइल उघडण्यासाठी क्लिक करा
6 प्रपत्र-1- महिला तक्रार निवारण कक्ष - “अंतर्गत तक्रार समिती" व "स्थानिक तक्रार समिती" चे कार्य / उद्देश फाइल उघडण्यासाठी क्लिक करा
प्रपत्र-2- समितीचे कार्यक्षेत्र.
प्रपत्र-3- अंतर्गत / स्थानिक तक्रार समिती गठित केल्याचा आदेश प्रदर्शित करणे बाबतचा नमुना/मजकूर.
प्रपत्र-4- विभागीय कार्यालयाने स्थानिक तक्रार समिती गठित केल्याचा आदेश निर्गमीत करणे बाबतचा नमुना/मजकूर.
7 भारत सरकारचे - HANDBOOK_ON_POSH1 (इंग्रजी भाषेतील) फाइल उघडण्यासाठी क्लिक करा
8 राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे - NALSA-POSH-Handbook. (हिंदी भाषेतील) फाइल उघडण्यासाठी क्लिक करा
9 तथापि ट्रस्ट, पुणे यांची मार्गदर्शक पुस्तिका. (मराठी भाषेतील) फाइल उघडण्यासाठी क्लिक करा

समितीचे गठन:

“अंतर्गत तक्रार समिती” सदस्यांमध्ये वरिष्ठ महिला अधिकारी अध्यक्ष व कर्मचारी वर्गातून महिलांच्या न्यायहक्कासाठी प्रतिबद्ध असणाऱ्या किंवा सामाजिक कार्याचा अनुभव आहे किंवा कायद्याचे ज्ञान असलेल्या दोनपेक्षा जास्त सदस्यांची निवड करण्यात येते. एक सदस्य हा निमसरकारी संघटना किंवा संस्था ज्या महिलांच्या न्यायहक्कासाठी प्रतिबद्ध आहेत किंवा अशी व्यक्ती जी महिलांच्या लैंगिक छळवणूक विषयाशी परिचित आहे अशा सदस्याचा समावेश असतो. समितीमध्ये एकूण सदस्य संख्येच्या कमीत-कमी निम्मे (50%) सदस्य या महिला असतात.

महिला तक्रार निवारण कक्ष - “अंतर्गत तक्रार समिती" व "स्थानिक तक्रार समिती" चे कार्य / उद्देश:-

  1. महामंडळाच्या सर्व कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या सबंध महिला वर्गाच्या हिताचे संरक्षण व कल्याणासाठी "महिला तक्रार निवारण कक्ष" स्थापन करणे.
  2. महिला वर्गाची लैंगिक/शारिरीक/मानसिक अथवा इतर कोणतीही छळवणूक रोखणे व त्यांचा सर्वसामान्य हितासाठी काम करणे व तक्रारीचे निवारण करणे.
  3. कामाच्या ठिकाणी महिला वर्गाला त्रासदायक वागणूक मिळू नये, यासाठी उत्तम, सुरक्षित आणि निर्भय वातावरण निर्माण करणे.
  4. कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळाविरोधातील तक्रारी गोपनीयतेने स्विकारणे.
  5. कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक/शारिरीक/मानसिक अथवा इतर कोणत्याही संबंधित छळाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची नियम व अधिनियमातील तरतुदीनुसार इन कॅмера व योग्य गोपनीयता राखून निष्पक्षपणे चौकशी करणे.
  6. वादी व प्रतिवादी दोघांनाही आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी देवून तसेच त्यांनी सुचविलेल्या व प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार त्यांचे जबाब नोंदवून त्यावर साकल्याने विचार करून एकमताने योग्य शिफारसींसह अहवाल मान्यतेस्तव स्थानिक तक्रार समिती >> अंतर्गत तक्रार समिती >> व्यवस्थापन या क्रमाने सादर करणे.
  7. दोषी आढळल्यास शिस्तभंगविषयक उपाययोजना स्थानिक तक्रार समिती >> अंतर्गत तक्रार समिती >> व्यवस्थापन या क्रमाने प्रस्तावित करणे.
  8. चौकशीअंती दोषी व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक तक्रार समिती >> अंतर्गत तक्रार समिती >> व्यवस्थापन या क्रमाने व्यवस्थापनाकडे अहवाल सादर करणे.
  9. पिडीत महिलेला आवश्यक मदत व सहकार्य पुरवणे.
  10. आस्थापनेमध्ये लैंगिक छळ रोखण्यासाठी जागरूकता निर्माण करणे व प्रशिक्षण आयोजित करणे.

कामकाजाचे ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक (संरक्षण, प्रतिबंध व निवारण) कायदा २०१३”अन्वये प्राप्त तक्रारींची चौकशी करण्यासाठी महाबीज मुख्य कार्यालय, अकोला स्तरावर स्थापन केलेली “अंतर्गत तक्रार समिती” 1 व विभागीय कार्यालय स्तरावर “स्थानिक तक्रार समिती” 6 अशा एकूण 7 समित्या व त्यांचे कार्यक्षेत्र खालील प्रमाणे आहे:

आस्थापनचे नाव – महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला.

तक्रार निवारण समिती स्थापन – आदेश जा.क्र.महाबीज/प्रशासन/सहायक/2026/644 दि.27.05.2026 (PDF फाइल उघडण्यासाठी क्लिक करा)

कार्यालयाचा ई-मेल – hoadmin@mahabeej.com

अंतर्गत तक्रार समिती सदस्यांची नावे खालीलप्रमाणे:

अ. क्र. समितीमधील व्यक्तीचे नाव, पद व कार्यरत ठिकाण समितीमधील पद
1 सौ.के.आर.बंड (म्हसाये), लेखापाल/अं.अं., विपणन विभाग, मुख्यालय, अकोला. अध्यक्ष
2 श्रीमती एस.डी.ताले, कनिष्ठ प्रक्रिया सहायक, दुरध्वनी कक्ष, मुख्यालय, अकोला. सदस्य
3 श्री.एम.ए.व्यास, विधी अधिकारी (कंत्राटी), विधी विभाग, मुख्यालय, अकोला. सदस्य
4 कु.व्ही.आर.सपकाळ, कृषि क्षेत्र अधिकारी, उत्पादन विभाग, मुख्यालय, अकोला. सदस्य

समित्यांचे कार्यक्षेत्र खालीलप्रमाणे:

अ.क्र. समिती स्थापन केलेल्या कार्यालयाचे नाव समितीचे कार्यक्षेत्र
1 महाबीज भवन, मुख्य कार्यालय, अकोला.

मुख्यालय अंतर्गत सर्व विभाग.

सर्व बिज परीक्षण प्रयोगशाळा / संशोधन व विकास विभाग / जैव तंत्रज्ञान केंद्र / जैविक उत्पादने प्रयोगशाळा.

विभागीय कार्यालय, कर्नुल (आं.प्र.) अंतर्गत सर्व कार्यालये.

वरीलपैकी कार्यालयात कार्यरत महिला मुख्यालय स्तरावरील “अंतर्गत तक्रार समिती” कडे दाद मागू शकतील.

उदा:- वरीलपैकी कार्यालयात कार्यरत महिला कर्मचारी आपली तक्रार अंतर्गत तक्रार समितीकडे सादर करतील >> अंतर्गत तक्रार समिती पडताळणी करुन आपला अहवाल व्यवस्थापनास सादर करतील >> व्यवस्थापनाकडून तक्रारीचे निराकरण केले जाईल.

2 विभागीय कार्यालय, अकोला

सर्व विभागीय कार्यालये.

विभागीय कार्यालयांतर्गत सर्व जिल्हा कार्यालये.

विभागीय कार्यालयांतर्गत सर्व बिज प्रक्रिया केंद्र.

वरीलपैकी कार्यालयात कार्यरत महिला विभागीय स्तरावरील “स्थानिक तक्रार समिती” कडे दाद मागू शकतील.

उदा:- वरीलपैकी कार्यालयात कार्यरत महिला कर्मचारी आपली तक्रार स्थानिक तक्रार समितीकडे सादर करतील >> स्थानिक तक्रार समिती पडताळणी करुन आपला अहवाल मुख्यालय स्तरावरील अंतर्गत तक्रार समितीस पाठवतील >> अंतर्गत तक्रार समिती पडताळणी करुन आपला अहवाल व्यवस्थापनास सादर करतील >> व्यवस्थापनाकडून तक्रारीचे निराकरण केले जाईल.

3 विभागीय कार्यालय, नागपूर
4 विभागीय कार्यालय, जळगाव
5 विभागीय कार्यालय, जालना
6 विभागीय कार्यालय, पूणे
7 विभागीय कार्यालय, परभणी

SHe-Box Portal बद्दल माहिती:

  • केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने पीडित महिलांना ऑनलाईन तक्रार नोंदविण्याकरिता SHe-Box (Sexual Harassment Electronic Box) हे पोर्टल विकसित केले आहे.
  • SHe-Box Portal Link: https://SHebox.wcd.gov.in/
  • हे पोर्टल सरकारी व खाजगी क्षेत्रातील महिलांना त्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी एक सुलभ व सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे.
Vichara