महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

Research and Devlopment

Research and Devlopment

१. प्र. महाबिज संशोधन व विकास विभागाची स्थापना कधी झाली?

उ. महाबीज संशोधन व विकास विभागाची स्थापना 199२ साली झाली.

२. प्र. महाबीज संशोधन व विकास विभाग डी.एस. आय.आर. मान्यताप्राप्त आहे का?

उ. होय संशोधन व विकास विभाग डी.एस. आय.आर. मान्यताप्राप्त आहे.

३. प्र. महाबीजचे संशोधनात्मक कार्य कोठे चालते?

उ. महाबीजचे संशोधनात्मक कार्य संशोधन व विकास विभाग शिवनी व पैलापाडा प्रक्षेत्र येथे चालते.

४. प्र. महाबीज संशोधन व विकास विभागाचे उद्देश आणि योगदान काय आहे?

उ. महाबीज संशोधन व विकास विभाग शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे हे रास्त दरात उपलब्ध करून देण्यात तसेच खाजगी बियाणे क्षेत्राची मक्तेदारी नियंत्रणात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

५.प्र. महाबीज संशोधन व व विकास विभागाचे कार्य कसे चालते?

उ. महाबीज संशोधन व विकास विभाग प्रमुख पिकांच्या सुधारित तसेच संकरित वाण निर्मितीचे तसेच गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मितीचे कार्य करते. यामध्ये कीड व रोगास सहनशील/ प्रतिकारक्षम वाणांची निर्मिती तसेच अजैविक ताणास सहनशील वाण निर्मितीचे कार्य करते.

६. प्र. संशोधन व विकास विभागाचे उद्दिष्ट काय आहेत?

उ. हवामान बदलास अनुरूप अधिक उत्पादनक्षम सुधारित वाणाची निर्मिती करणे तसेच जैविक ताणास सहनशील वाण निर्मिती करणे. मर्यादित पाणी आणि अन्नद्रव्यांचा सुयोग्य वापर यावर कार्य करणे.

७. प्र. संशोधन व विकास विभागात कोणत्या पिकांवर संशोधन चालते?

उ. ज्वारी, बाजरी, मका, कपाशी, तुर, सूर्यफूल, मूग, उडीद व भाजीपाला पिके.

८. प्र. ज्वारी पिकामध्ये महाबीजचे कोणते संकरित वाण आहेत?

उ. महाबीजचे ज्वारी पिकामध्ये तीन संकरित वाण आहेत महाबीज-७०४, महाबीज-७ आणि भाग्यलक्ष्मी-२९६. हे तिन्ही संकरित वाण खरीप हंगामासाठी योग्य आहेत.

९. प्र. बाजरी पिकामध्ये संकरित वाण उपलब्ध आहेत का?

उ. होय, बाजरी पिकामध्ये महाबीज १००५ हे प्रसारित व अधिसूचित वाण उपलब्ध आहे.

१०. प्र. मका पिकाचे कोणते संकरीत वाण महाबीज कडे उपलब्ध आहेत?

उ. मका पिकामध्ये उदय हे खरीप हंगामासाठी योग्य असे संकरित वाण उपलब्ध आहे. हे वाण प्रसारित आणि अधिसूचित आहे.

११. प्र. महाबीज कपाशीचे बीटी बियाणे पुरवते का?

उ. होय, महाबीज चे बीटी कपाशीचे संकरित वाण पीकेव्ही हायब्रीड-२ बीजी-२ आणि एन.एच.एच.-४४ बीजी-२ हे कोरडवाहू क्षेत्रासाठी महाराष्ट्रात लागवडी योग्य दोन संकरित वाण आहेत.

१२. प्र. महाबीज चे तूर पिकामध्ये वाण उपलब्ध आहेत का?

उ. महाबीजचे सध्या एम.पी.व्ही. १०६ ही वाण प्रसारित आणि अधिसूचित झालेले आहे.

१३. प्र. सुर्यफुलाचे किती संकरित वाण उपलब्ध आहेत?

उ. महाबीजचे संशोधित केलेले भास्कर हे सूर्यफूल संकरित वाण उपलब्ध आहे.

१४. प्र. मूग पिकाचे किती वाण उपलब्ध आहेत?

उ. मुग पीकाचे उत्कर्षा व उन्नती हे दोन संशोधित वाण उपलब्ध आहेत.

१५. प्र. उडीद पिकामध्ये किती वाण उपलब्ध आहेत?

उ. उडीद पिकामध्ये विजय आणि एम.यु. ४४ हे दोन वाण उपलब्ध आहेत.

१६. प्र. भाजीपाला पिकांमध्ये कोण कोणत्या पिकांवर संशोधन कार्य चालते?

उ. महाबीज भेंडी, वांगे, चवळी, गवार, शिरी दोडका, चोपडा दोडका, दुधी भोपळा, टमाटे आणि मिरची या भाजीपाला पिकांवर संशोधन करते.

१७. प्र. भाजीपाला पिकांमध्ये महाबीज चे कोणते वाण उपलब्ध आहेत?

उ. भाजीपाला पिकांमध्ये महाबीजचे पुढील वाण उपलब्ध आहेत : भेंडी –तनवी, संकरित वांगे- जयंत आणि यशवंत, शिरी दोडका – ऐश्वर्या, दुधी भोपळा –ईश्वर, चोपडा दोडका –दिव्यांका, चवळी- पार्वती, गवार- गौरी.

१८. प्र. महाबीज संशोधन व विकास विभागाचे संशोधित वाण शेतकऱ्यांना कोठे उपलब्ध होतील?

उ. महाबीज संशोधन व विकास विभागाचे संशोधित वाण शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेते आणि वितरक यांच्याकडे उपलब्ध होते.