महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
ठिकाण

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

संक्षिप्त माहिती

संक्षिप्त माहिती

परिचय

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजची स्थापना राष्ट्रीय बियाणे प्रकल्पाव्दारे कंपनी कायदा 1956 अंतर्गत करण्यात आली असून प्रत्यक्ष कार्यास दिनांक 28, एप्रिल 1976 रोजी पासून सुरूवात झाली आहे. महामंडळाच्या भाग भांडवलामध्ये महाराष्ट्र शासनाचा 49%, राष्ट्रीय बिज निगम लिमिटेड यांचा 35%, बिजोत्पादक शेतकरी यांचा 13%, व कृषि विदयापीठांचा 3% सहभाग आहे. त्यामुळे महामंडळ ख-या अर्थाने “शेतक-यांची बियाणे कंपनी” म्हणून यथार्थ ठरते.

 

महाराष्ट्र शासन

४९.००% समभाग

राष्ट्रीय बियाणे महामंडळ

३५.४४% समभाग

शेतकरी / बियाणे उत्पादक

१२.७०% समभाग

राज्य कृषी विद्यापीठे

०२.८६% समभाग

 

महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्या. अकाेला, संचालक मंडळ

श्री विकास चंद्र रस्तोगी, भा.प्र.से.,

अध्यक्ष (महाबीज) तथा परधान सचिव (कृषी) कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई

महाराष्‍ट्र शासनाव्‍दारे नामांकित पदसिद्ध अधिकारी व संचालक मंडळाचे अध्यक्ष

 

 

श्री. योगेश कुंभेजकर, ,

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला
महाराष्‍ट्र शासनाव्‍दारे नामांकित पदसिद्ध अधिकारी

 

 

श्री रवींद्र बिनवडे, भा.प्र.से.

कृषि आयुक्त, एमएस, पुणे (एमएस)

संचालक, महाराष्ट्र शासनाव्दारे नामांकित.

 

श्री. वल्लभराव तेजराव देशमुख,

पोस्ट- अमडापूर, ता-चिखली, जि- बुलढाणा.

संचालक, भागधारकांनी निवडलेले (उर्वरित महाराष्ट्र)

 

डॉ. रणजीत नि. सपकाळ,

सपकाळ रुग्णालय, सिविल लाइन रोड अकोला

संचालक, भागधारकांनी निवडलेले (अकोला विदर्भ)

 

 

डाॅ. मनिंदर कौर व्दिवेदी, भा.प्र.से.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (NSC) बीज भवन, पूसा कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली

संचालक, राष्‍ट्रीय बियाणे महामंडळ मर्या.,नवी दिल्ली

 

श्री. पी.के. पटनायक

अतिरिक्त जी.एम. मार्केटिंग, बीज भवन, पूसा कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली


संचालक, राष्‍ट्रीय बियाणे महामंडळ मर्या.,नवी दिल्ली

 

श्री. हेमंत सी. आर. चिमुरकर

रा.बि.म.मर्या,बीजभवन, गुलटेकडी, पुणे.

संचालक, राष्‍ट्रीय बियाणे महामंडळ मर्या.,नवी दिल्ली

 

संचालक मंडळाची घडण ही 11 नियुक्त सदस्य आणि भागधारक शेतक-यांमधून निवडणूक प्रक्रियाव्दारे निवडून आलेले 2 सदस्य अशा 13 सदस्यांनी पूर्ण होते. भारतीय प्रशासन सेवेतील ज्येष्ठ वरिष्ठ अधिकारी व महाराष्ट्र राज्याच्या कृषि विभागाचे सचिव हे महामंडळाचे पदसिध्द अध्यक्ष असुन, दैनंदिन कामकाज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी) यांचेव्दारे नियंत्रित करण्यात येते. महाबीजचे मुख्य कार्यालय महाराष्ट्रातील अकोला येथे आहे जे 6 विभागीय कार्यालय व 26 जिल्हा कार्यालयांनी समर्थित आहे. महाबीजचे 21 अत्याधुनिक बियाणे प्रक्रिया केंद्र असुन, महाबीज संशोधन व विकास तसेच एकूण गुणवत्ता व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करते.

महामंडळाव्दारे कडधान्यवर्गीय, डाळवर्गीय, तेलबियावर्गीय आणि चारा पिके यासारख्या बियाणांचे उत्पादन करण्यात येते त्यासाठी 32,215 बिजोत्पादक शेतक-यांच्या माध्यमातुन 1,66,010 एकर क्षेत्रावर बियाणे बिजोत्पादन कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले जाते. याकरीता बिजोत्पादक शेतक-यांना योग्य दर, लक्षांकापूर्तीनुसार प्रोत्साहनपर वा गुणवत्तेच्या आधारावर वाढीव दर इ. व्दारे बिजोत्पादक शेतक-यांना उच्च दर्जाचे बियाणे उत्पादनाकरीता प्रोत्साहित करण्यात येते. प्रक्रिया विभागाव्दारे बियाणे गुणवत्ता मानकांची पूर्तता करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येतो.

विपणन विभाग सुमारे 1000 विक्रेत्यांमार्फत शेतक-यांना अनुकुल असे विपणन धोरण अवलंबित असुन रास्त दरांत व निर्धारीत वेळेमध्ये बियाणे उपलब्ध करून देते. विक्रेत्यांना सुध्दा वेळेत बियाणे पुरवठा, “विक्री पश्चात सेवा” व विस्तार इ. पाठबळ देते. महामंडळाव्दारे शासकीय योजनांमध्ये प्राधान्याने बियाणे पुरवठा करण्यात येतो. तसेच इतर राज्यांमध्ये सुध्दा विपणनाचे कार्य करण्यात येते.

मागील वर्षी महामंडळाने रू. 538 कोटींची आर्थिक उलाढाल केली असून महामंडळाचे एकूण 318 कर्मचारी व याव्यतिरीक्त भागधारक, बिजोत्पादक शेतकरी विक्रेते इ. ही महामंडळाची शक्ती आहे व हया शक्तीच्या सातत्यपूर्ण व अथक प्रयत्नामुळेच महामंडळास आजपर्यत 16 वेळा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार प्राप्त झाले आहे. “महाबीज” हे विश्वासार्ह बियाणे आणि बियाणे उदयोगातील नवकल्पनांच्या वचनबध्दतेचे प्रतीक आहे.